जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील वाघोळा गावातल्या खुन प्रकरणातील संशयितांना औरंगाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
याबाबत वृत्त असे की, १९ जून २०२२ रोजी पारोळा तालुक्यातील वाघोळा गावात मोटर सायकल चा कट लागल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली होती. सदरच्या घटनेत नाना भिकारी पाटील यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी कलम ३०२,३०७,३२६,३२४,३२३,१४३,१४७,१४८ भा. द . वी व ४(२५) अन्वये पारोळा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला होता. त्यातील मुख्य आरोपी रोशन पुंडलिक पाटील व सुदाम रमेश पाटील यांचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायालय अमळनेर यांनी नाकारला होत. त्याविरुद्ध सदर आरोपींनी औरंगाबाद खंडपीठाकडे जामीनासाठी दाद मागितली होती.
उच्च न्यायालयाने दिनांक २८ मार्च २०२३ रोजी सदर प्रकरणात सुनावणी घेऊन आरोपीना सशर्त जामीन मंजूर केला आरोपींसाठी अॅड निर्मल दायमा, अॅड मगरे यांनी काम बघितले त्याना ऍड दंडाले व ऍड प्रवीण पाटील यांनी सहकार्य केले.