नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका चित्रात मोदी प्रभूरामांचे बोट धरून त्यांना मंदिराकडे नेताना दिसत आहे. या चित्रात मोदी मोठे आणि प्रभू राम यांना लहान दाखवण्यात आले आहेत, यावरून खुद को राम से बड़ा दिखाकर, खुश होने वालों तुमने, श्री रामचरितमानस का कौन सा भाग सीखा है?’, असा शब्दात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी टीका केली आहे.
भाजपा नेत्या शोभा करंदलाजे यांनी राम मंदिर भूमिपूजनासंदर्भात एक ट्विट केलं. त्यात पंतप्रधान मोदी आणि प्रभूरामचंद्राचं चित्र आहे. यामध्ये मोदी प्रभूरामांचं बोट धरून त्यांना मंदिराकडे नेताना दिसत आहे. या चित्रात मोदी मोठे आणि प्रभू राम यांना लहान दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांनी चित्रावर आक्षेप घेतला आहे. थरूर यांनी देखील आपल्या ट्वीटमधून टीका केली आहे. शशी थरूर यांनी ट्विट करत ‘ना प्रेम सीखा है, ना त्याग सीखा है, ना करुणा सीखी है, ना अनुराग सीखा है, खुद को राम से बड़ा दिखाकर, खुश होने वालों तुमने, श्री रामचरितमानस का कौन सा भाग सीखा है?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे.