खिरोदा ता. रावेर प्रतिनिधी । सध्या पावसाळा सुरू झाला आहे, मात्र लोहारा, कुंभारखेडा, रोझोदा, कोचूर या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.संबधीत विभागाने याकडे लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती करावेत अशी मागणी होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लोहारा, चिनावल आणि कुंभारखेडा हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यात खड्डे पडले आहे तर काही ठिकाणी पाण्याचे तळे साचले आहे. वाहन चालवणे म्हणजे कसरतच ठरत आहे. चिनावल, रोझोदा, लोहारा, कुंभारखेडा रस्ता दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील असा इशारा परिसरातील तरुणांनी दिला आहे.
लोहारा, जानोरी, पाल, वाघोदा, चिनावल, कुंभारखेडा या गावाकडे जाणारे रस्ते खराब झाले आहेत. या परिसरात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात असून वाहतूक यंत्रणेला विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील लोक आणि पर राज्यातील आलेले ट्रक्स नेहमीच रहदारीने वापरत असतात. तसेच आताचं पावसाळ्याचीही सुरूवात झाली असून, यामुळे वाहनधारकांना या नादुरुस्त रस्त्यामुळे जाणे येणे खूप कठीण होत आहे. शेतकऱ्यांनामध्ये तसेच ये-जा करणाऱ्या जनतेत संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याचे काम लवकर मार्गी लावावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पंचायत समिती सदस्य , जि.प. सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी पुढे आली आहे.