Home आरोग्य खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण !

खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण !


अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राणा यांच्या मुलगा आणि मुलीची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.

 

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील १० सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. नवनीत राणा यांचे सासू-सासरे म्हणजे रवी राणा यांचे आई वडील नागपूरच्या व्होकहार्ट रुग्णालयात दाखल आहेत. अशात नवनीत आणि रवी राणा यांच्या मुलाला आणि मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रवी राणा यांचे वडील आणि खासदार नवनीत राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट कालच पॉझिटिव्ह आला होता.


Protected Content

Play sound