खामगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने विद्यूत कायदा २०२१ च्या विरोधात आज खामगाव विद्युत विभागीय कार्यालयासमोर वीज कामगार व अभियंते यांनी निदर्शन केली.
आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सुधारित विद्युत कायदा 2021 विधेयक लोकसभा व राज्यसभा मध्ये मांडून पास करण्याचा केंद्र सरकार नी निर्णय घेतला आहे. या विद्युत कायदा 2021ला देश पातळी वरील 7प्रमुख कामगार व अभियंते यांच्या नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ एम्पलोयी अंड इंजिनीयर च्या नेतृत्वाखाली विरोध करत आहे. देशपातळीवरील विज कामगार अभियंते यांच्या नॅशनल को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ एम्पलॉइज अंड इंजिनीयर ला महाराष्ट्र मधील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सर्बोडीने इंजिनियर असोसिएशन व महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटक यांचा सहभाग आहे. त्यानुसार आज संसदेच्या पहिल्या दिवशी विरोध म्हणून विभागीय कार्यालय समोर दुपारी १ वाजता निदर्शने करून वीज कायदा 2021 चा विरोध करण्यात आला. या सभेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष सी.एन. देशमुख, सर्बोडीनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.