खामगाव प्रतिनिधी । खामगाव विधानसभा मतदार संघात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त 24 जानेवारी रोजी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
अनुषंगाने मतदार जनजागृती होण्याचे दष्टीने खामगांव तालुक्यामध्ये निवडणूक या विषयावर खुल्या गटाकरीता महिला व पुरुष यांचे करीता रांगोळी स्पर्धेचे 24 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृह, तहसिल कार्यालय खामगाव येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये जास्तीत-जास्त इच्छुकांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रथम व व्दितीय कमांक प्राप्त स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. नागरीकांना या स्पर्धे सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.