खामगाव प्रतिनिधी । एकीकडे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांन येथे एका विवाहितेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
खामगाव येथील चोवीस वर्षीय विवाहितेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. पीडित महिला रस्त्यावर उभी असताना तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने स्विफ्ट गाडीमध्ये बसवून नेण्यात आलं. पुढे गेल्यानंतर गाडीतील तरुणांनी तिला गुंगीचं औषध दिलं आणि शेगाव रोडवरील शेतात नेऊन गाडीतील तीन तरुणांपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला. या तीन तरुणांसह गाडीमध्ये एक अजून महिलादेखील होती. या बलात्कार प्रकरणी तीन पुरुष आणि एक महिला असे चार आरोपी असून चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र महिलादिनीच घडलेल्या या घटनेनंतर खामगाव परिसरात खळबळ उडाली आहे. तसंच या प्रकरणात एक महिलाही आरोपी असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.