जळगाव, प्रतिनिधी । शहरातील टॉवर चौकात खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या मालकीच्या व हॉटेल पकवानसह अन्य व्यावसायिकांना नियम धाब्यावर बसवून कराराने दिलेल्या जागा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज पोलीस बंदोबस्तात मंडळ अधिकारी जळगाव शहर योगेश नन्नवरे यांच्या पथकाने ताब्यात घेतली.
शहरातल्या टॉवर चौकात खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या मालकीची जागा आहे. तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी सर्व सेवा समितीला अटी-शर्तींच्या अधीन राहून भाडे कराराने दिली होती. या संस्थेने सर्व नियम धाब्यावर बसवून काही व्यावसायिकांना या जागा भाड्याने दिल्या होत्या. यात हॉटेल पकवानसह अन्य व्यावसायिक प्रतिष्ठानांना समावेश होता. या प्रकरणी माहिती अधिकारी कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी पाठपुरावा करून संबंधीत जागा महामंडळाला परत मिळावी अशी मागणी केली होती. त्यांना सातत्याने प्रकरण लाऊन धरल्यानेच २७ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हाधिकार्यांनी ही जागा ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने आज मंडळ अधिकारी यांच्या पथकात परिरक्षक, जळगाव तलाठी, शहर पोलीस स्टेशनचे तीन कर्मचारी यांचा समावेश होता. हे पथक सकाळी ठीक ११ वाजता खादी ग्रामोद्दोग येथे दाखल झाले होते. प्रत्यक्ष सील करण्याचे काम सकाळी ११.३० वाजता सुरु करण्यात आले. पहिल्या मजल्यावर पकवान हॉटेलचे चार काचेचे शटर सील करण्यात आले. तळमजल्यावर पाचही दुकाने सील करण्यात आले. ही कारवाई दुपारी २.३० वाजेपर्यत सुरु होती. याप्रसंगी हॉटेल बंद करून कुलुपाला सील लावण्यात आले.
दुकाने सील करण्याची प्रक्रिया
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/239209557110117/
मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे यांची प्रतिक्रिया
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/503357330595883/