नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकच्या चांदवडमध्ये कोरोना व्हायरसचा एक संशयित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मूळचा मुंबईतील वाशीचा रहिवासी असलेला हा रुग्ण २९ फेब्रुवारीला न्यूझीलंडहून भारतात परत आला होता.
संशयित रुग्ण न्यूझीलंडहून भारतात परत आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून नाशिकला आपल्या बहिणीकडे आलेला होता.त्याच्यात श्वास घेण्यात अडथळे आणि कोरोनाची इतर लक्षणे दिसून आली. ४ मार्च पासून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, नाशिकमध्ये आणखी एका ६९ वर्षीय रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. ती व्यक्ती नुकतीच दुबईतून परतली होती.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news