खळबळजनक : जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये भरदिवसा १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर आज दुपारी एका १० वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पिडीत मुलगी आपल्या आजीसोबत भिक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, आज दुपारी साधारण १ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटलगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे पिडीत मुलगी उभी होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तुला खायला देतो म्हणून तिला तिसऱ्या मजल्यावर नेले. तिसऱ्या मजल्यावरील एका मुतारीत नेत त्या व्यक्तीने तिच्यावर पाशवी अत्याचार केला आणि त्यानंतर तेथून पळ काढला. पिडीत मुलगी रक्ताने माखलेल्या कपडयांवर रडत रडत खाली आपल्या आजीकडे आली आणि सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर आजीने पिडीत नातीला सोबत शहर पोलीस स्थानक गाठले. पोलिसांनी तात्काळ गोलाणी मार्केट गाठले. पिडीत मुलीकडून घटनास्थळाबाबत माहिती जाणून घेतली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, शहर पोलीस सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, पिडीत मुलीचे कपडे रक्ताने माखलेल होते. भेदरलेली असल्यामुळे तिला व्यवस्थित माहितीसुद्धा सांगता येत नव्हती.

Protected Content