मुंबई वृत्तसंस्था । भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांच्याशी भेटण्याचे कोणतेही नियोजन नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.
एकनाथराव खडसे मुंबईत दाखल झाले असून शरद पवार तसंच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान शरद पवार यांनी खडसे यांच्या भेटीचे वृत्त फेटाळले आहे. त्यांना एकनाथ खडसेंसोबत भेट होणार का ? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, खडसेंसोबत भेटीचा कोणताही नियोजित कार्यक्रम नाही. त्यांच्या भेटीबद्दल अशी कोणती विनंतीही करण्यात आलेली नाही. उद्या मी दिल्लीला जाणार आहे. पण, आज अशी कोणतीही भेट नाही. दरम्यान एकनाथ खडसे यांनी आपण वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आलो असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.
तर दुसरीकडे एकनाथराव खडसे यांनी देखील आपण शरद पवार यांची भेट घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात असे असले तरी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरूनचा सस्पेन्स वाढीस लागल्याचे दिसून येत आहे.