चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील खडकी बु|. येथील जि.प. शाळेला कुंपणाची भिंत बांधून देण्यासाठी गावाच्या हद्दीत स्थित असलेल्या अंबुजा कंपनीने पुढाकार घेतला आहे. या बांधकामाचा शुभारंभ नुकताच कंपनीचे अध्यक्ष चितलांगे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री. चितलांगे यांनी खडकी गावाच्या विकासासाठी अंबुजा कंपनी सगळ्या प्रकारचे सहकार्य देण्यास तयार असल्याचे स्पष्ट करीत त्याचा लागेल तो सगळा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी विकास कामांचा एक प्रस्ताव कंपनीकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी ग्राम पंचायत प्रशासनाला केले. यावेळी कंपनीचे प्रकल्प अधिकारी वैभव पाटील, कार्मिक व्यवस्थापक योगेश काळे, जि.प. सदस्य भाऊसाहेब जाधव, सरपंच मुश्ताक खाटिक, ग्रामविकास अधिकारी के.डी. पाटील, तसेच सगळे ग्राम पंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.