Home धर्म-समाज खंडोबा देवस्थान महिला मंडळ अध्यक्षपदी सुनंदा नारखेडे

खंडोबा देवस्थान महिला मंडळ अध्यक्षपदी सुनंदा नारखेडे

0
30

 

फैजपूर, प्रतिनिधी ।येथील खान्देशवासीयांचे आराध्यदैवत खंडोबा देवस्थान या देवस्थानात महिला मंडळची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी सुनंदा धनेश्वर नारखेडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या खंडोबा देवस्थानात परिसरात एकनव चैतन्य निर्माण व्हावे म्हणून खंडोबा देवस्थानाचे गादीपती महामंडलेश्वर पुरूषोत्तम दासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवड करण्यात आली आहे.

खंडोबा देवस्थानात रोज सकाळ-संध्याकाळ अध्यात्माच्या रंगात शेकडो भाविक भक्त रमून जातात.दररोज शिवस्तुती,रामरक्षा, रामस्तुती, जानकीस्तुती, खंडोबास्तुती नित्य नियमाने होत असते. हा परिसर भक्तिमय वातावरणात एकत्रित महिला मंडळी जमत असते. या महिला मंडळ समितीत अध्यक्षपदी सुनंदा नारखेडे तर सदस्य म्हणून वंदना पाटील, प्रतिभा होले, माधुरी चौधरी, चारू तळेले, ललिता राणे, मंदाकिनी राणे, रत्ना चौधरी, अलका माळी, कांता सरोदे, ज्योती बेंडाळे, स्वाती भारंबे, अर्चना फेगडे, सरला माळी, शालिनी फेगडे, पुनम पाटील, रत्ना नारखेडे,.कांचन भारंबे, वर्षा फेगडे, करुणा चौधरी, शिवानी बढे, ज्ञानेश्वरी सरोदे, दिपमाला वारके, नलिनी माळी, संगीता नारखेडे, मंगला पाटील, प्रतिभा नारखेडे ह्या महिला मंडळातील सदस्या एकत्र येऊन धार्मिक कामात आपला सहभाग नोंदवितात.


Protected Content

Play sound