जळगाव प्रतिनिधी । हरीविठ्ठल नगरजवळील खंडेराव नगरात राहणाऱ्या ४२ वर्षीय व्यक्तीला शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याने काहीही कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दिलीप मंगा सुर्यवंशी (वय-४२) रा. खंडेराव नगर, भाईवाडा हे आपल्या पत्नी व दोन मलींसह राहतात. मोलमजुरी काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दिलीप सुर्यंवशी हे कामावरून घरी आले. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे राजू वंजारी व त्यांची पत्नी (पुर्ण नाव माहित नाही) यांनी काहीही कारण नसतांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यांचा जाब विचारल्याचा राग आल्याने राजू वंजारी याने धरातील फावड्याचा दंडुका आणून बेदम मारहाण करून जखमी केले. त्यावेळी दिलीप यांची पत्नी सुरेखा आणि भाचा विशाल सोमवंशी यांनी सोडवा सोडव केली. याप्रकरणी दिलीप सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अरूण डोलारे करीत आहे.