यावल, प्रतिनिधी । तालुक्यात महावितरण कंपनीच्या माध्यमातुन सर्वसामान्य घरगुती विज ग्राहकांकडुन अन्यायकारक पद्धतीने वसुल करण्यात येत असलेली वीजबिल वसुली न थांबल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा सहाय्यक अभियंता ए. बी. दमाडे महावितरण कंपनी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की यावल तालुक्यात महावितरण कंपनीच्या माध्यमातुन अधिकारी आणि कर्मचारी हे घरगुती विज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळातीत विज वापरण्याचे अव्वा की सव्वा बिल आकारणी करत आहेत. कोरोना संकटासमयी चुकीच्या पद्धतीने होणारी विज बिलांची वसुली ही तात्काळ थांबवावी. त्याचप्रमाणे पुढील काळात वारंवार यावल शहरासह तालुक्यातील ज्या ज्या गावात कुठलेही कारणा नसतांना दुरुस्तीच्या नांवाखाली खंडीत होणारा विजपुरवठा पुर्वरत सुरू ठेवण्यात यावा. वास्तविक ही लॉकडाऊन संकटाची वेळ असुन नागरीकांना वेठीस धरून सक्तीने व मनमानीपणे आणि जाणीवपुर्वक चुकीची बिल वसुली ही तात्काळ थांबवावी व कुठलेही कारण दाखवुन वारंवार होणारा खंडीत विजपुरवठा बंद करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येइल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल शहराध्यक्ष चेतन अढळकर, तालुका सचिव संजय नन्नवरे विरेन्द्र राजपुत , आबीद कच्छी , ईस्हाक मोमीन ,किशोर नन्नवरे , साहील बडगुजर, रोहीत सुतार गोवींदा सुतार , अमोल सोनवणे , शाम पवार ,गौरव कोळी यांच्या स्वाक्षरी आहेत .