जळगाव प्रतिनिधी । वाजवीपेक्षा अधिक प्रमाणावर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मयतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत करावी अशी मागणी संभाजी सेनातर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाभरात सुरू असलेली गौणखनिजांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही वाहतूक करतांना ओव्हरलोड केले जातात. लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट अधिकाऱ्याच्या अशीर्वादाने वाहतूक सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत हजार हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तसेच सध्या चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी लागणाऱ्या गौणखनिज वाहनांवर क्षमतेपेक्षा जास्तीचे भरणा केले असता. यात डंपर रस्त्यावर वाहतूक करीत असतात तरीदेखील आपल्या प्रशासनातील संबंधीत अधिकाऱ्यांना दिसन नाही. ते अधिकारी आंधेळ झाले आहेत की त्या ओव्हरलोड वाहतूकदारांकडून मिळणाऱ्या पैशांमुळे आंधळे होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. क्षमतेपेक्षा जास्त गौणखनिजाची मोठ्याप्रमाणावर वाहतूक होत असल्याने अपघात होवून अनेक निष्पाप बळी गेले आहे. प्रशासनाने याची दाखल घेत क्षमतेपेक्षा जास्त गौणखनिजाची मोठ्याप्रमाणावर वाहतूकदारांवर सदोष मनुष्याचा वधाचा गुन्हा दाखल करावा अश्या मागणीचे निवेदन संभाजी सेनाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ, जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, जिल्हा प्रवक्ता जनार्दन कोळी, शहराध्यक्ष गजानन पाटील, संतोष तायडे, अविनाश काकडे, भागवान सोनवणे, सुरेश पाटील, प्रविण पाटील, शिवाजी पाटील यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.