क्वारंटाईन केलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

यवतमाळ (वृत्तसंस्था) गावातील शाळेत क्वारंटाईन करण्यात आलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे घडली आहे. रामा विठ्ठल आत्राम (वय २५) असे आत्महत्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे रामा विठ्ठल आत्राम, हनुमान अय्याजी आत्राम (वय 20) आणि सुरेश अरुण आत्राम (वय 21) हे तिघे अहमदनगर येथील खाजगी कंपनीत कामाला होते. लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आल्यानंतर हे तिघेही बसने यवतमाळ आणि यवतमाळवरुन मारेगाव येथे पोहोचले. तिथे तालुका प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी करुन गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शाळेत क्वांरटाईन केले. परंतू गावातील नागरिक आणि कुटुंबीय कोरोनाच्या भीतीने त्यांच्या जवळ येत नव्हते. १४ मे रोजी दुपारी रामा आत्राम हा शौचाच्या निमित्ताने बाहेर गेला. परंतू दोन दिवस शोध घेऊनही रामा कुठेही सापडला नाही. मात्र, दोन दिवसांनी गावा जवळच्या तलावावर रामा पळसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Protected Content