पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नांद्रा ता. पाचोरा येथील क्रिएटिव्ह स्कूलचा यावर्षी ३१ डिसेंबर रोजी २०२२ या सरत्याच्या वर्षाच्या दिवशी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, याबरोबरच इतर खाद्यपदार्थातून आपल्या शरीराला उपयुक्त असलेले विटामिन यांची माहिती व्हावी व विद्यार्थ्यांनी घरून स्वतः बनवून आणलेल्या खाद्यपदार्थांची त्यांना स्वतः विविध स्टॉल लावून त्याची विक्री कशी करतात ?
याबरोबरच व्यावसायिक ज्ञान, बरोबरच आरोग्य विषयी खाद्यपदार्थ किती महत्त्वाचे आहेत ? शरीराला कोणत्या पदार्थापासून कोणते जीवनसत्व मिळतात ? हे कळवण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा आला. याप्रसंगी जवळजवळ विद्यार्थ्यांचे ५० स्टॉल लागले होते. यावर दोन विद्यार्थी मिळून एका स्टॉलवर विविध प्रकारचे विटामिन युक्त खाद्यपदार्थ यांचे प्लेटा सजवून खवय्यांसाठी सज्ज होत्या.
विविध प्रकारचे स्टॉलला नाव देऊन विद्यार्थ्यांसमवेत पालकही महिला भगिनी उपस्थित होत्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्था मध्ये उपमा, डोसा इडली, व्हेज बिर्याणी, भेळ, पकोडा, मेथी पकोडा, पालक भजी, मेथी भजी, पाणीपुरी, मंचुरियन, व्हेज पुलाव, लिंबूयुक्त सरबत, पोहे, कळण्याची भाकर, पालक दशमी असे विविध प्रकारचे वेगवेगळे ५० खाद्यपदार्थ बनवलेले होते यामध्ये प्रत्येकाने सुमारे १२० ते १५० रुपये खरी कमाई केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना आपले आई – वडील कष्ट करून आपल्याला सकाळी डब्बा करून देण्यासाठी आईची होणारी तारांबळ कळाली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आई-वडील शिक्षक यांच्या विषयी कृतज्ञता ही आपल्या बोलण्यातून व्यक्त केली या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महिला पालक प्रतिनिधी कुरंगी व इतर खेड्यातील महिला पालक उपस्थित होत्या.
तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच शिवाजी तावडे, किरण सोनार, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष बाविस्कर, गजानन पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, समाधान पाटील, प्रशांत चौधरी, मुनीर शेख, पंढरीनाथ पाटील, सागर पाटील नवल पाटील नामदेव पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक यशवंत पवार व कार्यक्रम यशस्वीतेसाठी नम्रता पाटील, अरुंधती राजेंद्र, वैशाली पाटील, सोनल गोसावी, पुनम सोनवणे, श्वेता बोरसे, पूजा काळेष अनुराधा पाटील, पूजा धोबी,श यांनी परिश्रम घेतले.