जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शाहू नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला कौटुंबिक वादातून शिवीगाळ व मारहाण करून घरातून हाकलून दिल्याचा प्रकार घडली आहे. याप्रकरणी गुरूवार १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील शाहू नगर येथील माहेर असलेल्या सना इमरान खान (वय-२५) यांचा विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील इमरान खान मुजम्मील खान यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर पती इमरान याने लहान सहान कारणावरून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्या कौटुंबिक वादात पतीसह सासरच्या मंडळींनी देखील गांजपाठ केला. या छळाला कंटाळून विवाहिता जळगाव निघून आल्या. गुरूवार १८ ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.
त्यांच्या तक्रारीवरून पती इमरान खान मुजम्मील खान, अरिफ खान मुजम्मील खान, आलीया खान आरीफ खान, रीजवान खान, मालेखा शेख सर्व रा. सिध्दी चौक, कन्नड जि.औरंगाबाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संगिता खंडारे करीत आहे.