Home Cities अमळनेर कौटुंबिक कारणावरून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

कौटुंबिक कारणावरून एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । कौटुंबिक कारणावरून कारणावरून एका प्रौढ व्यक्तीला ६ जणांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडा यांनी बेदम मारहाण करून कंबर दुखापत केली. या संदर्भात रविवार १६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मारवड पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मारवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेख रहीम शेख मुनीर (वय-५५) रा. मांडळ ता. अमळनेर जि. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. घरातील कौटुंबिक कारणावरून त्यांचे व्याही मोहसीन शेख सलीम, आयाज असेल सलीम, जुनेर शेख जुहूर, शकीर शेख भिलू, नेगार शेख शाकिर, नसीम शेख जवूर रा. मांडळ ता. अमळनेर लाकडी दांडा व लोखंडी रॉड यांनी बेदम मारहाण करून जखमी केली तसेच जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. याप्रकरणी मारवाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका भरत ईशी करीत आहे.


Protected Content

Play sound