जळगाव, प्रतिनिधी | शिवसेना-युवासेना व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवसैनिक विराज कावडीया यांच्या पुढाकाराने कोविड लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम सोमवार १ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे.
शहरातील तुकारामवाडी-गणेशवाडी परिसरात सोमवार दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. १८ वर्षा पुढील सर्व व्यक्तींसाठी कोविशिल्ड डोस, पात्र व्यक्तींसाठी दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. शिबिराचे उदघाटन शिवसेना जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत व महापौर जयश्री महाजन यांचे हस्ते होणार आहे. या वेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लद्धा, उपमहापौर कुलभूषण पाटील, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, ज्योती शिवदे, युवासेना विस्तारक किशोर भोसले, विधानसभा क्षेत्र प्रमुख राधेशाम कोगटा, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, पियुष गांधी, यशश्री वाघ, वैष्णवी खैरनार, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, झाकीर पठाण, मानसिंग सोनवणे, नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी, प्रशांत नाईक, मनोज चौधरी, इबा पटेल, आदी शिवसैनिक उपस्थित राहणार आहे.