कोविड, नोटबंदी आणि जीएसटी अपयशाच्या केस स्टडी म्हणून शिकवल्या जातील

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टी शिकवल्या जातील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी करोनाच्या स्थितीवरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

 

 

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. भविष्यात हॉवर्डमध्ये जेव्हा अपयशावर अभ्यास केला जाईल तेव्हा या तीन गोष्टींचा उल्लेख असेल असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. हॉवर्डच्या बिजनेस स्कूलमध्ये भविष्यात अपयशाच्या केस स्टडी म्हणून कोविड, नोटबंदी आणि जीएसटी या तीन गोष्टी शिकवल्या जातील, असे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करताना नरेंद्र मोदींचा व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओ नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना कोरोना व्हायरसविरोधातील लढाई २१ दिवसांमध्ये जिंकू असे सांगत आहेत. व्हिडीओत कोरोनाविरोधातील लढाईला १०० पेक्षा जास्त दिवस झाले असून भारत जागतिक देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असल्याचेही दाखवण्यात आले आहे.

Protected Content