कोळी समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी समाज बांधवांचे उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । अनुसूचित जमाती टोकरे कोळी व ठाकूर जमातीचे दाखले मिळावे, या मागणीसाठी प्रवर्तन बहुउद्देशीय संस्था, आदिवासी टोकरी कोळी समाज परिषद आणि आदिवासी वाल्मीक लव्य सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  उपोषण करण्यात आले.

 

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जळगाव शहर व तालुक्याचे प्रांताधिकारी महेश सुरळकर हे अनुसूचित जमाती टोकरे कोळी व ठाकूर जमातीचे दाखले नियम व कायदे यांना बगल देऊन दाखले देण्यास नकार देत आहे. याचा निषेध म्हणून प्रवर्तन बहुउद्देशीय संस्था, आदिवासी टोकरे कोळी समाज परिषद आणि आदिवासी वाल्मीक नव्य सेनेच्या वतीने गुरुवार १५ जून रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. यापूर्वी देखील दाखणे देण्यात यावे, यासाठी प्रशासनाकडे मागणी केली होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. जातीचे दाखले तातडीने देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. याप्रसंगी प्रवर्तन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाट, योगेश बाविस्कर, गुलाब बाविस्कर, गजानन शिरसाट, ऍड. विक्रम देवराज, विश्वास सोनवणे, प्रदीप सोनवणे, गोकुळ सूर्यवंशी, रवींद्र कोळी, विकास सोनवणे, रामचंद्र साळुंखे, सुनील सोनवणे यांच्यासह समाज बांधव यांची उपस्थिती होती.

Protected Content