जळगाव प्रतिनिधी । दुर्धर आजाराला कंटाळून एका ६८ वर्षीय वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी शहरातील कोल्हे नगरात उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील किन्ही शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक किशोर हरी चौधरी (वय-६८) रा. कोल्हे नगर, जळगाव हे आपल्या पत्नी व मुलासह राहतात. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांनी दुर्धर आजाराने ग्रासले होते. शहरातील खासगी रूग्णालयात अनेक उपचार करूनही आजारापासून सुटका होत नव्हती. दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी मंगळवारी मध्यरात्री घरात पत्नी व मुलगा झोपलेले असतांना मगच्या घरात जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. या घटनेची रामानंद नगर पोलीसांना देण्यात आली. घटनेचा पंचनामा करून रामांनद नगर पोलीस ठाण्यात पुतण्या किरण चौधरी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन विवाहित मुली असा परीवार आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.