सांगली (वृत्तसंस्था) देशासह जगभरात कोरोना व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात भितीचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे २७ मार्चला पासून सुरू होणाऱ्या १००व्या नाट्य संमेलन पुढे ढकलत असल्याची घोषणा नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. यंदाचे नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून या कालावधीमध्ये होणार होते.
कोरोना संसर्गजन्य आजार असल्यामुळे गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन रद्द करण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारने लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन केले आहे. म्हणूनच सांगलीत होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनावर झाला आहे. यंदा सांगलीत होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नाट्य परिषदेकडून देण्यात आली आहे.