जळगाव, प्रतिनिधी । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज जळगाव येथे दिग्विजय स्पोर्टस, एज्युकेशन सोसायटीतर्फे करोनाच्या संक्रमणासी प्रत्यक्ष लढणाऱ्या योद्धांचे अभिनंदन करण्यात आले.
कोरोनाच्या संक्रमणासी लढणारे योद्धे डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस प्रशासन यांचा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दिग्विजय स्पोर्टस, एज्युकेशन सोसायटीतर्फे पुष्पहार, फूल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील, अशोक लाडवंजारी, जितेंद्र बागरे, सुनील माळी, दिलीप माहेश्वरी, दिलीप शिरोळे, दिग्विजय बागरे, महेश सदकेपाटिल, हार्दिक बागरे, प्रदीप भोई, हर्षल तेजकर, आदित्य बागरे, भरत पाटील, तेजस खरारे ,प्रदीप चंदन, किशोर धनगर आदी उपस्थित होते.