Home राजकीय कोरोना संकटात शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मदत देण्याचा शरद पवारांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

कोरोना संकटात शेतकरी, छोट्या व्यापाऱ्यांना मदत देण्याचा शरद पवारांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सल्ला


 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन मोठ्या शस्त्रक्रियांनंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून  कोरोना संकटात शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मदत द्या, असा सल्ला दिला आहे

 

शरद पवार यांनी निवासस्थानी पुन्हा एकदा कामकाजाला सुरुवात केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह केलं. त्यात पवार निवासस्थानी कार्यकर्ते आणि काम घेऊन आलेल्या लोकांना भेटत आहेत.  त्यांच्या समस्या जाणून घेत काही सूचनाही करत असल्याचं या फेसबुक लाईव्हमध्ये पाहायला मिळत आहे.

 

शरद पवार यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.


Protected Content

Play sound