कोरोना व्हायरसचा धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू

korena

पेईचिंग वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसचा धोका सर्वप्रथम सांगणाऱ्या डॉक्टरांचा कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू झालाय. ली वेनलियांग असं या डॉक्टरचं नाव आहे. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनच ही माहिती दिलीय. वेनलियांग आणि इतर 8 जणांनी कोरोना नावाचा भंयकर विषाणू चीनमध्ये आल्याचे सर्वप्रथम सांगितले होते.

चीनच्या वुहान येथे 30 डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते. या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांनी या आजाराचं निरिक्षण केल्यानंतर हा कोरोना व्हायरस असल्याचे त्यांना आढळून आले. गेल्या महिन्याभरापासून चीनमध्ये या आजाराने आतापर्यंत पाचशेहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळं चीनमध्ये तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तैवानच्या एका वृत्तसंस्थेने केलाय. चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

चीनमध्ये प्राणघातक अशा कोरोना व्हायरसने आतापर्यंत पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास 11,791 लोकांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. चीनमधील वुहान शहरात या व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. याठिकाणी शेकडो भारतीय लोक राहतात. या गंभीर परिस्थितीतून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने एअर इंडियाचं एक स्पेशल विमान पाठवलं होतं. हे विमान वुहान शहरातील 324 भारतीयांना घेऊन दिल्लीत आलंय.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content