Home धर्म-समाज कोरोना व्हायरसचा जगातून नायनाट व्हावा खंडोबा चरणी भाविकांचे साकडे 

कोरोना व्हायरसचा जगातून नायनाट व्हावा खंडोबा चरणी भाविकांचे साकडे 

0
23


 

फैजपूर, प्रतिनिधी। जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा नायनाट व्हावा असे साकडे खंडोबा देवाला घालून खंडोबा यात्रेची समाप्ती शनिवारी करण्यात आली.

खंडोबा देवस्थान गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तमदासजी महाराज, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर, भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी जि. प.सदस्य भरत महाजन, पत्रकार अरुण होले, यांच्या हस्ते समाप्ती पूजन करून कोरेना व्हायरसचा भारत देशासह जगातून नायनाट व्हावे व जगाचे कल्याण होऊन सुख समृद्धी नांदावी असे खंडोबा चरणी साकडे घालण्यात आले. यावेळी पुरोहित नंदू जोशी, हिमांशू जोशी यांनी वैदिक पद्धतीने जप व पूजन केले. खान्देश वासियांचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबा देवस्थान यात्रा सात दिवस भरगच्च भरली होती. या यात्रेत लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला व भांडरा उधळून मनसोक्तपणे मल्हारी मार्तंडचा जयघोष करत यळकोट यळकोट जय मल्हार गजराने भाविक भक्तगण तल्लीन झाले होते. आज शनिवारी खंडोबा देवस्थान यात्रा समाप्ती दिवशी भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते . यावेळी संजू चौधरी धुळे, पवन महाराज, राम मनोहरदास महाराज, पंडित राणे, बाळू नारखेडे, धनु नारखेडे, वैभव वकारे, राहुल साळी, चंदू भिरुड, संजय सराफ, सौ सुनंदा नारखेडे, वंदना पाटील, मंदाकिनी राणे, स्वाती भारंबे यासह भाविक भक्त गणांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound