धरणगाव (प्रतिनिधी) कोरोना व्हायरस देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. याकाळात आपत्कालीन कायद्यानुसार अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांनाच डीझेल, पेट्रोल देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. अगदी यासाठी संबंधितांना पासेस देखील देण्यात आल्या आहेत. परंतू धरणगावात शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नोबल पेट्रोल पंपावर बेकायदेशीररित्या पेट्रोल,डीझेलची सर्रास विक्री सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार आपत्कालीन कायद्यानुसार अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय, जीवनावश्यक वस्तू,महावितरण, पत्रकार यांनाच पेट्रोल/ डिझेल देण्याचे आदेश आहेत. यासाठी त्यांना विशेष पास देखील देण्यात आल्या आहेत. परंतू धरणगाव शहरालगत जळगाव रोडवरील नोबल पेट्रोल पंपवर उघडपणे कुणालाही पेट्रोल, डीझेल विकले जात असल्याचा एक व्हिडीओ ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ कडे एका प्रेक्षकाने पाठवला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता देशभर लॉकडाऊनसारख्या गंभीर काळात अशा पद्धतीने पेट्रोल दिल्यास संचारबंदी कशी यशस्वी होईल?. नागरिकांचा या आजारापासून कसा बचाव होईल? असा संताप काही लोकप्रतिनिधींनी नुकताच व्यक्त केला होता. सोशल डिस्टस्टिंग तसेच सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचे देखील या व्हीडीओत स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, या पेट्रोल पंपावर जिल्हाधिकारी तथा प्रांतधिकारी काय कारवाई करतात? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. या संदर्भात नोबल पेट्रोल पंप संचालकाशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1124170137932324