Home क्राईम कोरोना लॉकडाऊन : दारुची दुकाने बंद, तरुणाने केली आत्महत्या !

कोरोना लॉकडाऊन : दारुची दुकाने बंद, तरुणाने केली आत्महत्या !


थ्रिस्सूर (वृत्तसंस्था) लॉकडाऊनदरम्यान देशभरात दारूची दुकानं बंद आहेत. केरळमध्ये दारू न मिळाल्यामुळे आज सकाळी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केचेरीनजीक असलेल्या थुव्वानूर येथे उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या मृत व्यक्तीचे नाव कुलंगर वित्तील सनोज असे आहे.

 

मृत व्यक्तीस दारूचे व्यसन होते, त्याला दररोज दारू लागत असे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केल्यानंतर सर्व दारूची दुकाने बंद असल्याने दारू मिळत नसल्याने तो निराश होता. तर मृतांचा भाऊ प्रदीप यांनी सांगितले की, सनोज अनेक कारणांमुळे व्यधित होता. आई-वडील हे आजारी राहत होते. त्यातच त्याला नौकरी नव्हती त्यामुळे चांगली नोकरी देखील नव्हती. त्यातच देशातील लॉकडाऊनमुळे नोकरिची संधी संपुष्टात आली. या सर्व तणावामुळे सनोज दारू पित होता.


Protected Content

Play sound