नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गेल्या २ दिवसांपासून ४० हजारांच्या आत असलेली नव्या कोरोना बाधितांची संख्या गेल्या २४ तासांत पुन्हा ४० हजारांच्या वर गेली आहे.
लोकांकडून सातत्याने केलं जाणारं नियमांचं उल्लंघन, मास्क वापरण्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष आणि लोकांमध्ये आलेला निर्धास्तपणा या पार्श्वभूमीवर देशातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. देशभरात नव्या आकडेवारीनुसार ४१ हजार १५७ नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. २४ तासांत देशात तब्बल ५१८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
देशात गेल्यात २४ तासांमध्ये एकूण ४२ हजार ००४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ३ कोटी २ लाख ६९ हजार ७९६ इतका झाला आहे.
आजच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत भारतात ४ लाख १३ हजार ६०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण बाधितांची संख्या जरी जास्त दिसत असली, तरी त्यापैकी आजघडीला फक्त ४ लाख २२ हजार ६६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.