जळगाव प्रतिनिधी। अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी जीवाची पर्वा न करता कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेत त्यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा नियोजन भवनात सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला.
राज्य शासन, महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत जळगाव नागरी प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कोरोना काळात महामारी व संकटात सर्वेक्षणाचे कार्य जीवाची पर्वा न करता केल्याने त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी अभिजित राऊत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एस. पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कार्यक्रम अधिकारी रफीक तडवी, जिल्हा मुख्य सेविका आदी उपस्थित होते.
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. बालविकास प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंह परदेशी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्य्कामाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे कौतुक करून अभिनंदन केले जिल्हाधिकारी यांनी अध्यक्षीय भाषणात समाज हेच कुटुंब समजून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीच्या संकटात अंगणवाडीताई, मदतनीस यांनी केलेल्या कार्याचा विशेष अभिनंदन केले.
सर्व सेविकांचा सन्मानपत्र देऊन अभिनंदन केले.
विनोद ढगे व त्यांच्या समूहाने अंगणवाडी सेविका, सावित्रीच्या लेकी व कोरोना योद्धा आणि बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर पथनाट्य सादर केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक प्रकल्पातील एका सेविकेचा प्रतिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी वृंद सर्व संरक्षण अधिकारी , समुपदेशक, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी आदींचा सन्मानपत्र देऊन करू कोरोन योद्धे म्हणून गौरवण्यात आले.
यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद महिला बाल विकास विभाग, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प जळगाव व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांचे सहकार्य लाभले. मुख्यसेविका रत्ना चौधरी यांनी आभार मानले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/309644713759872