कोरोना : मालेगावात २४ तासात रुग्णांचा आकडा ९ वर पोहोचला

मालेगाव (वृत्तसंस्था) मालेगावातील कोरोना बाधितांचा आकडा चोवीस तासात ९ वर पोहोचला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

 

मालेगावात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच असून गुरुवारी रात्री ५ जणांना लागण झाली आहे. यातील एकाचा आधीच मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारपर्यंत केवळ २ करोना रुग्ण होते. गुरुवारी सकाळी त्यात अचानक वाढ झाली. मालेगावात ५ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. गुरुवारी मध्यरात्री पुन्हा ५ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने २४ तासात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ झाली आहे.

Protected Content