सावदा प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन परिक्षा घेणे अशक्य आहे. त्यामुळे प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गाची परिक्षा रद्द करण्यात आले. मात्र एटीकेटी आणि बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांना याबाबत संभ्रम निर्माण झाले असून परीक्षा सरसकट रद्द कराव्यात अशी मागणी येथील युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आत्तापर्यंत १ हजार ६००च्या उंबरठ्यावर येवून ठेपला आहे. राज्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतू एटीकेटी किंवा बॅकलॉग (राहिलेले विषय) असलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये अद्याप संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षा होतील की नाही असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशा सुचना दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालक यांच्यात प्रचंड गोंधळ निर्माण झाला असून परीक्षेबाबत शंकाकुशंका निर्माण होत आहे. लॉकडाऊन काळात अनेक विद्यार्थी गावाकडे निघून गेले. त्यांचे सर्व अभ्यासाचे पुस्तक वसतीगृहात पडून आहेत. तर काहीकडे ऑनलाईन अभ्यास करणे शक्य नाही. परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. आमच्या निवेदनाचा विचार करून सरसकट परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी येथील युवासेना विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. विविध मागणींचे निवेदन आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे देण्यात आले. निवेदनावर संघटनेचे सदस्य अभय पाटील, यश पाटील, अक्षय महाजन यांनी लेखीपत्राद्वारे केली आहे.