कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस

लंडन : वृत्तसंस्था । कोरोना महामारी संपेल हे स्वप्न जगाने पाहण्यास हरकत नाही असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी केलं आहे.

अनेक देशांमध्ये लसींवर काम सुरु आहे. काही ठिकाणी लसी तिसऱ्या टप्प्यातही आहेत. त्यांचे परिणाम पाहिले तर आता आपण कोरोना महामारी संपेल असं स्वप्न पाहण्यास हरकत नाही असं मत टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी व्यक्त केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. असं असलं तरीही जे प्रगत आणि श्रीमंत देशांनी लसीच्या आशेवर गरीब आणि मागास देशांना ठेवू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस हे या सभेत असं म्हणाले की “कोरोना काळात जगाने माणसाची चांगली रुपं पाहिली आहेत तशीच वाईटही रुपं पाहिली आहेत. मात्र ही महामारी संपली तरीही गरीबी, भूक आणि असमानता यामध्ये परिवर्तन होऊ शकतं हे विसरुन चालणार नाही. “

Protected Content