भुसावळ, प्रतिनिधी । येथे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आज पोलिसांनी परिसर सील करण्याचे काम हाती घेतले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीला नगरपरिषदेचे कर्मचारी न आल्याने पोलिसांनी परिसर सील करण्यास प्रारंभ केले आहे.
शहरातील आठवडे बाजाराजवळील संतोषी माता मंदिर भागात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत व पोलीस कर्मचारी यांनी पंचशील नगर भागात सकाळी ९.३० ते १०.३० वाजेपर्यत नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट पाहिली. मात्र, एकही कर्मचारी घटनास्थळी न पोहचल्याने स्वतः गंगाराम प्लॉट, पंचशील नगरमधील नाल्याची हद्द,अनिल हॉटेल,शनी मंदिर भागातीळ साईबाबा मेडिकल,पापा नगर जवळील नाल्याच्या पुला पर्यत हद्द हातगाडी व बांबू बांधून परिसराला सील करण्याचे काम सुरू आहे. उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांनी राष्ट्रवादी पार्टीच्या नगरसेविका मीनाक्षी धांडे यांचे पती नितीन धांडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. व त्यांनी धांडे यांच्या भागातील ३० तरुणांची टीम देण्यास सांगितले. तसेच त्या तरुणांचे आयकार्ड पोलिक अधीक्षक यांच्याकडून बनवून देण्याची जबाबदारी उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांनी स्वीकारली आहे.