भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता शहरातील प्रभागात जंतुनाशक फवारणी करीत आहे . शहरात काही भागात पालीकेच्या माध्यमातून मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळच्या प्रभाग क्रमांक ९ व १९ मध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली.यावेळी नगरसेवक पिंटू कोठारी , नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, यांचेसह भुसावळ नगरपरिषदचे अधिकारी प्रदीप पवार, वसंत राठोड, तसेच कर्मचारी चंद्रकांत पाटिल ,धर्मेंद्र खरारे यांचेसह सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .