जळगाव प्रतिनिधी । शहरातील सालारनगर परिसरात रहिवासी असणार्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आल्यानंतर रात्री उशीरा हा परिसर सील करण्यात आला असून येथे इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, काही दिवसांपूर्वीच मेहरूण येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यानंतर बुधवारी सायंकाळी आणखी एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मेहरूणच्या रूग्णाच्या संपर्कात आलेले त्याचे आप्त आणि अन्य लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या कालच निगेटीव्ह आलेल्या आहेत. या पार्श्वभूमिवर, आज दुसरा संशयितदेखील पॉझिटीव्ह आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
हे वृत्तदेखील वाचा : जळगावातील कोरोनाचा दुसरा रूग्ण पॉझिटीव्ह
दरम्यान, संबंधीत रूग्ण हा सालारनगर परिसरातील रहिवासी असून त्याचे गोडाऊन शहरातील जोशीपेठेत आहे. या पार्श्वभूमिवर, रात्री उशीरा सालारनगर परिसर सील करण्यात आला. बाहेरीला नागरिकांना येथे बंदी करण्यात आली आहे. तर जोशीपेठेतील परिसरही बंद करण्यात आला आहे. त्या रूग्णाच्या कुटुंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्यांची देखील चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हे वृत्तदेखील वाचा : कोरोनाच्या एंट्रीने आता जळगावकरांची खरी परीक्षा
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००