Home आरोग्य कोरोना : पुण्यात पाच तासात दोन महिलांचा मृत्यू

कोरोना : पुण्यात पाच तासात दोन महिलांचा मृत्यू


पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात कोरोनावर उपचार घेत असताना गेल्या पाच तासांत दोन महिलांचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१ वर गेली आहे.

पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका ५८ वर्षीय महिलेसह सोमवार पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांना अन्य आजारांनी देखील ग्रासले होते असे देखील सांगण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनामुळे ससूनमधील मृतांची संख्या २२ झाली असून पुण्यातील एकूण मृतांची संख्या ३१वर पोहोचली आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound