पुणे (वृत्तसंस्था) कोरोनो विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व परमीट रूम, बार आणि रेस्टॉरंट, क्लब ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) अर्थात परमीट रूम, फॉर्म ई/ ई -2/ अर्थात बार व रेस्टॉरंट, एफएल-4 (कायमस्वरूपी) एफएल-4 (तात्पूरती) अर्थात क्लब या परवानाधारकांचे व्यवहार १८ मार्च ते ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत पूर्णपणे बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.