Home राजकीय कोरोना : पंतप्रधानजी तुम्हीच सणासारखे वातावरण तयार केले ; संजय राऊत यांची...

कोरोना : पंतप्रधानजी तुम्हीच सणासारखे वातावरण तयार केले ; संजय राऊत यांची मोदींवर टीका


मुंबई (वृत्तसंस्था) आपल्या पंतप्रधानांना चिंता लागून राहिली आहे की लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीय. प्रिय पंतप्रधानजी तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखे वातावरण तयार केलात तर असेच होणार. सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर होईल, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त करत लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीय. कृपा करून स्वत:ला वाचवावे, आपल्या कुटुंबीयांना वाचवावे. सरकारच्या सूचनांचे नीट पालन करावे. राज्य सरकारांना माझी विनंती आहे की, लोकांकडून नियम आणि कायद्यांचे पालन करून घ्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. आपल्या पंतप्रधानांना चिंता लागून राहिली आहे की लॉकडाऊनला लोक गंभीरतेने घेत नाहीय. प्रिय पंतप्रधानजी तुम्ही भीती आणि चिंतेच्या वातावरणातही सणासारखे वातावरण तयार केलात तर असेच होणार. सरकार गंभीर असेल तरच जनताही गंभीर होईल, अशी टीका राऊत यांनी केली.


Protected Content

Play sound