रावेर, प्रतिनिधी । येथील न्यायालयाचे न्या. आर. एल. राठोड, न्या. आर. एम. लोळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत न्यायालयाचे आवारात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन नागरिकांनी घराच्या बाहेर निघू नये व स्वच्छतेवर भर द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, प्रत्येकांनी घरातच राहावे, भाजीपाला , औषधी घेतांना गर्दी करू नये. भाजीपाला विक्रेते यांनी एकाच ठिकाणी दुकान न लावता दूरदूर लावावे. प्रत्येक नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवावे. स्वच्छतेवर प्रत्येकाने लक्ष केंद्रित करावे. नाकाला मास्क लावावे. साबण, डेटॉल,फिनाईल, सॅनिटायझर ने नेहमी हात स्वच्छ ठेवावे. कोरोनाचे प्रसार होणार नाही या दृष्टीने प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. न्यायालयाने पुढाकार घेऊन कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी पॉम्पलेट सुद्धा छापण्यात आले आहेत. या बैठकीतप्राथमिक आरोग्य केंद्र रावेरचे डॉ. महाजन, डीवायएसपी पिंगळे, पो. नि. रामदास वाकोडे, तहसीलदार उषाराणी देवगुणे, सीओ श्री लांडे रावेर,ऍड. निळे, ऍड. सुरज चौधरी आदी हजर होते. कोरोना व्हायरस संदर्भात जनतेत सुरक्षिततेचे दृष्टीने काळजी घेणे व उपाय योजना संदर्भात बैठक झाली असता यावर सर्वात महत्वाचे म्हणजे नागरिकांनी घराचे बाहेर निघू नये व स्वच्छतेवर भर देणे याचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे.