कोरोना : नगराध्यक्ष चौधरी यांनी उपलब्ध केले स्वखर्चाने पीपीई किट व इतर साहित्य

 

धरणगाव, प्रतिनिधी । अमळनेर येथील कोरोनाग्रस्त महिलेशी धरणगाव येथील ५ नागरिकांचा संपर्क आला होता. यापार्श्वभूमीवर लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आरोग्य रक्षकांसाठी स्वखर्चाने पीपीई किट, सॅनिटायझर व इतर साहित्य दिले आहे.

कोरोनाग्रस्त महिलेशी संपर्क आलेल्या पाच नागरिकांपैकी एक व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात ४ नागरिकांना धरणगाव येथे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या कोविड १९ सेंटर येथे विलगीकरण करण्यात आले. कोविड १९ सेंटर येथे चोवीस तास डॉक्टर, नर्स त्यांची देखभाल करत आहेत. डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांना पीपीई किट व सॅनिटायझर नागराध्यक्ष चौधरी यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले आहेत. याव्यतिरिक्त कोण कोणत्या सुविधा करता येतील याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना भेटून चर्चा करणार असल्याचेही नागराध्यक्ष चौधरी यांनी मानस व्यक्त केला.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/847688332385028/

 

Protected Content