नवी दिल्ली : : वृत्तसंस्था । आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ( शनिवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत) भारतात २३ हजार ०६७ कोरोना रुग्णांची नोंद झालीय. एकूण संक्रमितांची संख्या १ कोटी ०१ लाख ४६ हजार ८४५ वर पोहचलीय. रिकव्हरी रेट : ९५.७७ टक्के आणि पॉझिटिव्हि रेट : २.७५ टक्के व डेथ रेट : १.४५ टक्के आहे
कोरोना संक्रमणाच्या कचाट्यात जगभरातील १९१ देश सापडले आहेत. जगभरात आत्तापर्यंत जवळपास ७ कोटी ९३ लाख जण कोरोना संक्रमणाच्या विळख्यात अडकलेत. ३ कोटी २९ लाख हून अधिक जणांवर जगभरात उपचार सुरू आहेत. ४ कोटी ४६ लाखांहून अधिक जणांनीं कोरोनावर मात केलीय.
गेल्या २४ तासांत ३३६ जणांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे आत्तापर्यंतच्या एकूण मृतांची संख्या १ लाख ४७ हजार ०९२ वर पोहचलीय.
आत्तापर्यंत देशात एकूण ९७ लाख १७ हजार ८३४ रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. गेल्या २४ तासांत २४ हजार ६६१ रुग्ण या आजारातून बरे झालेत. सोबतच, देशाचा रिकव्हरी रेट ९५.७७ टक्क्यांवर पोहचलाय.देशात सध्या २ लाख ८१ हजार ९१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.