तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) देशात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद आहेत. यामुळे तळीरामांची अडचण झाली आहे. परंतू केरळमध्ये दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील एकाचा मृत्यू झाला असून इतर चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.
केरळमध्ये गेल्या ५ दिवसांमध्ये ५ जणांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दारू न मिळाल्याने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल लोक उचलत असल्याचे म्हटले जात आहे. दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून इतर चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या ही ९०० वर पोहोचली आहे.