जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने गुरुवारी पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ८३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे तर ३७४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-२५ जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१८, अमळनेर-२, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-६, रावेर-१, पारोळा-१, चाळीसगाव-१२, मुक्ताईनगर-१०, बोदवड-१ असे एकुण ८३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार १८७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४७ हजार १२४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आतापर्यंत एकुण २ हजार ५८८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.