Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात आढळले दोन बाधित ; एक रुग्ण झाला बरा

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात आढळले दोन बाधित ; एक रुग्ण झाला बरा

0
64

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रुग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एक बाधित रुग्ण बरा झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयात कडून आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यात दिवसभरात भुसावळ तालुक्यात १ व एरंडोल तालुक्यात १ असे दोन बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७७५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत १ लाख ४० हजार १८१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १७ रूग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार ५७७ रूग्णांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound