कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात २ बाधित रूग्ण आढळले; ३ रूग्ण कोरोनामुक्त !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात २  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे, तर ३ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज बोदवड तालुक्यात दोन  रूग्ण आढळले आहेत.  तर ३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. सध्या ३२  रुग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्हा प्रशासनाने आज पाठवलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ६७३  कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार ६६  रुग्ण कोरोनामुक्त मुक्त होऊन घरी परतले आहे. तर आज पर्यंत २ हजार ५७५ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे

 

Protected Content