कोरोना : जिल्ह्यात आढळले पाच कोरोना बाधित रुग्ण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोरोना रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जिल्ह्यात पाच बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे.

 

जळगाव जिल्ह्यात आज जळगाव शहर – ०३ तर एरंडोल तालुक्यात दोन बाधित रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ५१ हजार ५२० बाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९१६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ९ कोरोना रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले.

Protected Content